Sanjay Raut on Mallikarjun Kharge: संजय राऊत यांचा मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा; म्हणाले, भाजपला सरकारी नोकऱ्या संपवायच्या आहेत
Sanjay Raut, Mallikarjun Kharge (PC - PTI)

Sanjay Raut on Mallikarjun Kharge: शिवसेना-भाजपमधील वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीये. नुकतेचं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपबद्दल केलेल्या एका वक्तव्यात म्हटलं आहे की, पक्षाला देशाचे सरकार उद्योगपतींच्या हातात द्यायचे आहे. संजय राऊत यांना काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी खरगे यांचे विधान पूर्णत: बरोबर असून त्यांच्याशी सहमत असल्याचे सांगितले.

संजय राऊत म्हणाले, खर्गे जी म्हणाले ते अगदी बरोबर आहे. हळूहळू संपूर्ण सरकार उद्योगपतींकडे सोपवण्यात येईल. ही भीती आपणा सर्वांना वाटत आहे. राऊत पुढे म्हणाले, “यात त्यांनी काय चुकीचे म्हटले आहे? सरकारी नोकऱ्यांसाठी सार्वजनिक क्षेत्र हे मुख्य स्त्रोत आहे. त्यातील मोठा भाग विकला गेला आहे. सर्व मोठमोठे सार्वजनिक उद्योग त्यांच्या मित्रांना विकण्यात आले आहेत. आता त्या कंपन्यांमध्ये कंत्राटी नोकऱ्या सुरू केल्या आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप सरकार सरकारी नोकऱ्या काढून टाकू इच्छित असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.