Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Scam) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना 30 जुलै रोजी ईडीने (ED) ताब्यात घेतलं. त्यानंतर 8 दिवस ईडी कोठडीत राहिल्यानंतर न्यायालयानं राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तरी आज 22 ऑगस्ट आहे म्हणजे संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीचा शेवटचा दिवस. त्यामुळे आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) हजर करण्यात येणार आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची चौकशी अजुन संपली नसल्याने ईडी आज संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी वाढवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे न्यायालयात आज काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

 

संजय राऊतांची सध्या आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) आहेत. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं देण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam)  प्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात ईडीनं समन्स (ED Summons) बजावलं आहे. संजय राऊतांबरोबरचं वर्षा राऊत यांचीही चौकशी सुरु आहे. तरी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालय काय सुनावणी करणार हे संजय राऊत तसेच शिवसेनेच्या (Shiv Sena) दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 23 ऑगस्टला!)

 

तसेच महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर देखील आज (22 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी होणार होती पण काही कारणास्तव ती लांबणीवर ढकलण्यात आली आहे. तरी सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी आणि मुंबई सत्र न्यायालयातील पात्राचाळ प्रकरण सुनावणी हे शिवसेनेच्या दृष्टीने दोन्ही मोठे निर्णय असणार आहे.