Sanjay Niruapm On Sanjay Raut: संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार, त्यांनी आपली मुलगी, भाऊ आणि पाटर्नरच्या नावे पैसे घेतले; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप (Watch Video)
Sanjay Niruapm (PC - X/ANI)

Sanjay Niruapm On Sanjay Raut: काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी महाराष्ट्रातील खिचडी घोटाळा प्रकरणी (Khichdi Scam Case) अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. वास्तविक, ईडीने खिचडी घोटाळ्याप्रकरणी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे यूबीटी उमेदवार अमोल कीर्तिकर यांना चौकशीसाठी बोलावले. यादरम्यान संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. कारण या प्रकरणात संजय राऊतही आरोपी आहेत. संजय निरुपम यांनी ईडीकडे तपासाची व्याप्ती वाढवण्याची विनंती केली आहे. अमोल कीर्तिकर यांच्या सोबत संजय राऊत यांनाही अटक करण्यात यावी, असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार - संजय निरुपम

संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्या विरोधात पुरावे असल्याचा दावा केला आहे. ईडीने त्याला अटक केल्यास ते पुरावे सादर करतील, असंही निरुपन यांनी म्हटलं आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलताना संजय निरुपम म्हणाले की, आज 8 एप्रिल रोजी ईडीने उत्तर पश्चिम मुंबईतील शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार खिचडी चोर यांना समन्स बजावले आहे. येथील मतदारांना कळायला हवे, त्यांचे उमेदवार चोर आहेत. मात्र तो एकटाच खिचडी चोर नाही, संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे किंगपिन आहेत. ते या घोटाळ्याचे सूत्रधार आहे. पत्रा चाळ घोटाळ्यात त्याने पत्नीच्या नावावर पैसे घेतले आणि इथे मुलगी आणि भावाच्या खात्यात पैसे जमा केले. या संपूर्ण व्यवहाराची माहिती माझ्याकडे आहे. (हेही वाचा - Congress Expels Sanjay Nirupam From Party: संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसची मोठी कारवाई; सहा वर्षांसाठी पक्षातून केली हकालपट्टी)

सह्याद्री रिफ्रेशमेंटला 6 कोटी 71 लाख रुपयांचे खिचडी पुरवठ्याचे कंत्राट मिळाले होते. सह्याद्रीच्या खात्यातून त्यांची मुलगी विदिता हिच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले. मुलीच्या खात्यात तीनदा तर भावाच्या खात्यात दोनदा पैसे आले. भागीदार सुजित पाटकर यांच्या खात्यातही पैसे आले. बीएमसीने त्यांना 33 रुपयांत 300 ग्रॅम खिचडी मोफत पुरवण्याचे कंत्राट दिले. पुढे सह्याद्रीने 100 ग्रॅम खिचडीसाठी 16 रुपयांना सब कॉन्ट्रॅक्ट दिले. (वाचा - Sanjay Nirupam on Sanjay Raut: काँग्रेस नेत्याकडून संजय राऊत यांच्या नावाने खडे फोड, शिवसाना, राष्ट्रवादी संपविल्याचा आरोप)

पहा व्हिडिओ - 

ईडीने तपासाची व्याप्ती वाढवावी आणि अमोलसह संजय राऊतला अटक करावी, मी पुरावे सादर करेन. मी खिचडी चोरच्या विरोधात प्रचार करणार, माझे पुढचे पाऊल काय असेल, येत्या दोन-तीन दिवसांत ठरवले जाईल, असंही संजय निरुपम यांनी यावेळी नमूद केलं.