Sanjay Raut | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पडदा पडला, सत्ता आली, मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र तरीही महाराष्ट्रातील फोडाफोडीचे राजकारण काही संपलेले नाही. बहुमत मिळूनही भाजप सत्तेत आली नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी ही असणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही. असं असल्यामुळे विरोधी पक्षात बसलेले भाजप आता फोडाफोडीचे राजकारण करण्याची शक्यता आहे. ज्याला 'ऑपरेशन लोटस' असे म्हटले आहे. यात अनेक मंत्री पक्षबदल करु शकतात अशीही शक्यता आहे. त्यामुळे या सर्वावर पडदा टाकत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांचीच खिल्ली उडविली आहे.

एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका करत निशाणा साधला आहे. आमचे आमदार गळाला लागणार नाहीत. आमचे मासे त्यांच्या जाळ्यात जाणार नाहीत आणि आमच्या ऊसाला त्यांचा कोल्हाही लागणार नाही, अशी बोचरी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. मी नाराज नाही, शिवसेनेची बदनामी व्हावी यासाठी हितचिंतकांनी माझ्या राजीनाम्याची पुडी सोडली; अब्दुल सत्तार यांचे स्पष्टीकरण

विरोधकांच्या स्वप्नात रात्री सत्ता येते आणि सकाळी झोपेतून उठल्यावर सत्ता जाते. हा स्वप्नदोष आहे. 105 आमदार असतानाही सत्ता येऊ शकली नाही हा धक्का ते पचवू शकले नाहीत. त्यामुळे ऑपरेशन लोटसच्या अफवा पसरविल्या जात आहेत. आम्ही त्याला घाबरत नाही.

एका वृत्तवाहिनीशी चर्चा करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर खरपूस टीका करतानाच ऑपरेशन लोटसची खिल्लीही उडवली. ऑपरेशन लोटसबिटस काही नसतं. आमचे हातही अनेक ऑपरेशन करून तयार झाले आहेत. आमचेही ऑपरेशन थिएटर आहे. आम्ही नाजूक हाताने सर्वात जास्त चिरफाड करू शकतो. 105 आमदार असूनही सत्ता आली नाही, याचा धक्का विरोधकांना बसला आहे असेही म्हणते.