Samruddhi Mahamarg (Pic Credit: Wikimedia Commons)

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur  Samruddhi Expressway) अद्याप पूर्ण झालेला नाही. परंतू ने अशाच अपूर्ण अवस्थेतील समृद्धी महामार्गावर येत्या 1 एप्रिल पासून टोल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 20% टोल वाढवण्यात आला आहे. पूर्वी प्रति किलोमीटर हलक्या वाहनांसाठी ₹1.73 आहे. कमर्शिअल हलक्या वाहनांसाठी ₹2.79 आहे. अवजड वाहनांसाठी ₹5.85 आहे तर oversized vehicles साठी सर्वाधिक ₹11.17 आहे. पण 1 एप्रिल पासून या टोल मध्ये वाढ होणार आहे. जारी जाहिरातीनुसार, MSRDC ने   संपूर्ण 701  किमी लांबीच्या प्रवासासाठी SUV सह चारचाकी वाहनांसाठी वन वे टोल सध्याच्या 1250 रुपयांवरून 1450  रुपये केला आहे. नवीन दर 1 एप्रिल2025  पासून लागू होतील आणि 31 मार्च 2028 पर्यंत राहतील.

1 एप्रिल पासून समृद्धी महामार्गावरील टोलचे दर काय?

सुधारित टोल चार्ट्स नुसार, हलक्या वाहनांसाठी प्रति किमी ₹2.06 मोजावे लागतील. कमर्शिअल हलक्या वाहनांसाठी ₹3.32, अवजड वाहनांसाठी ₹6.97 पासून ₹7.60 आकरले जाणार आहेत.तर जड कंस्ट्रक्शन मशीन साठी ₹10.93 आणि oversized vehicles साठी ₹13.30 द्यावे लागणार आहेत. नक्की वाचा: FASTag Mandatory: फास्टटॅग नसल्यास 1 एप्रिलपासून दुप्पट भरावा लागणार टोल; पहा कसा बनवायचा फास्टटॅग ऑनलाईन, ऑफलाईन .

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी एक्सप्रेस वे चे विविध टप्प्यात उद्धाटन

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्प्याटप्प्याने प्रवाशांना खुला करण्यात आला आहे. यामध्ये 11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किमी एक्सप्रेस वेचे उद्घाटन केले होते. नंतर, 23 मे 2023 ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी ते भरवीर असा 105 किमीचा मार्ग खुला केला. कोणत्याही राजकीय कार्यक्रमाशिवाय, 4 मार्च 2024 रोजी आणखी 25 किमी (भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा) मार्ग वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला. आता शेवटचा 76 किमीचा रस्ता बाकी आहे. हा भिवंडी-इगतपुरी रस्ता आहे. जो सुरू होणं अद्याप बाकी आहे.

नोव्हेंबर 2015 मध्ये पहिल्यांदा जाहीर झालेल्या या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचे बांधकाम फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाले. हे बांधकाम 16 पॅकेजेसमध्ये विभागण्यात आले होते. त्यावेळी या महामार्गावर 40 वर्षांच्या कालावधीसाठी टोल वसूल केला जाईल. असं सांगण्यात आले होते.