Salman Khan House Firing: सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा कट कॅनडात रचला; मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
Firing outside Salman Khan's house, PC Pixabay

सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर रविवारी, पहाटेच्या पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान आपल्या कुटुंबीयांसह राहतो. सलमान खानला इशारा देण्यासाठी हा गोळीबार करण्यात  आल्याची धमकी ही लॉरेस्न बिश्नोई गँगकडून देण्यात आली. तर, दुसरीकडे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात आता मोठ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.  (हेही वाचा - Salman Khan's House Firing: सलमान खानच्या घराबाहेर हल्लेखोर गोळीबार करतानाचा व्हिडिओ समोर, एका हल्लेखोराची ओळख पटली)

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे पथक दिल्ली, बिहार, जयपूर येथे रवाना करण्यात आले आहेत.  फेसबुक पेजवर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या  आयपी ॲड्रेस कॅनडाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आयपी अॅड्रेस हा कॅनडातील असला तरी यामध्ये व्हीपीएनचा वापर झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून हा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर काही तासांनंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने एका कथित फेसबुक ऑनलाइन पोस्टमध्ये घटनेची जबाबदारी स्वीकारली

मुंबई पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फूटेज लागले असून आरोपींचा चेहराही समोर आला आहे. एका आरोपीची ओळख पटली असल्याची माहिती आहे. सलमान खानच्या घरावरील हल्ल्यात विशाल राहुल उर्फ ​​कालूचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारा विशाल राहुल उर्फ ​​कालू हा गुरुग्रामचा रहिवासी असल्याचे पोलिसांच्या डॉजियरमध्ये समोर आले आहे. कालूने दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून त्याच्यावर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.