Sakinaka Rape and Murder Case: राज्य सरकार कडून पीडीतेच्या कुटूंबाला 20 लाखांची मदत
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबई मध्ये मागील आठवड्यात अंधेरीच्या साकीनाका (Sakinaka) परिसरात एका 34 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि अमानुष लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने देशभर या घतनेची चर्चा झाली आहे. दरम्यान आज घटनेच्या तपासाची माहिती देताना राज्य सरकार कडून या पीडीतेच्या कुटुंबाला 20 लाखांची मदत मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale) यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मदत टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. Uddhav Thackeray On Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया.

साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकारणामध्ये मोहन चौहान या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई सीपींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपला गुन्हा कबुल केलेला आहे. सध्या 21 सप्टेंबर पर्यंत त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्याकडील हत्यारं ताब्यात घेण्यात आली असून पुढील 15-20 दिवस तपास सुरू राहील तर महिन्याभरात चार्जशीट बनवली जाईल असे देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान पीडीता एका विशिष्ट जातीची असल्याने अ‍ॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हे देखील वाचा- Mumbai Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी, महिलेचा जबाब घेता आला नाही- मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे.

ANI Tweet

मुख्यमंत्र्यांनी आज पोलिस दलासोबत शहरातील महिला सुरक्षा व्यवस्था प्रकरणी विशेष बैठक बोलावली होती. यामध्ये सारे अधिकारी सहभागी होते. दरम्यान साकीनाका बालात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देशही काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.