साईबाबा जन्मस्थळ वादावरून आज पासून बेमुदत शिर्डी बंद; मंदिर मात्र सुरु राहणार
Sai Baba (Photo Credits: Shirdi Saibaba Sansthan Facebook)

साईबाबा जन्मस्थळाच्या (Saibaba Birthplace)  वादावरून शिर्डी (Shirdi) आणि पाथरी (Pathari) ग्रामस्थांमधील वाद आणखीनच चिघळत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर आज 19 जानेवारी पासून बेमुदत शिर्डी बंदची पुकारण्यात आला आहे. यामुळे आजपासून अनिश्चित काळासाठी शिर्डी मध्ये हॉटेल, वाहतूक आणि अन्य सर्व सुविधा या बंद असणार आहेत. असं असलं तरी साईबाबा मंदिरात दर्शनासाठी काहीही परिणाम होणार नाही अशी ग्वाही काल शिर्डी संस्थानचे कार्यकारी अध्यक्ष दीपक मुगलीकर (Deepak Mugulikar) यांनी दिली होती. मॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती

काही दिवसांपूर्वी पाथर्डी ग्रामस्थांनी साईबाबांचा जन्म पाथरी मध्ये झाल्याचे दावे केले होते यात भर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद सभेत "ज्या ठिकाणी साईबाबांचा जन्म झाला, तिथे 100 कोटींची विकासकामांचा आरखडा तयार करण्यात आला असून लवकरच भूमिपूजन देखेल होईल" अशी घोषणा केली होती. यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी अधिकच आक्रमक होऊन पाथरी मध्ये 100 नव्हे तर 200 कोटींची कामे केली तरी चालतील पण त्या ठिकाणाला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून संबोधू नका असा पवित्र स्वीकारला होता.

ANI ट्विट

शिर्डी ग्रामस्थांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, ‘साईसतचरित्र’मध्ये साईबाबांच्या जन्मस्थळाचा व वास्तव्याच्या ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख आहे, मात्र तरीही अनेक ठिकाणी साईंच्या जन्माचे दावे केले जातात इतकेच नव्हेत तर साईबाबांना या पूर्वी सुद्धा अनेकांनी धर्मात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असे देखील म्हंटले आहे. याच बाबींच्या निषेधार्थ हा बंद पुरकरण्यात आला आहे.

दरम्यान, या वादावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी उद्या, सोमवारी 20 जानेवारी रोजी शिर्डी ग्रामस्थांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. यात काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तत्पूर्वी आज शिर्डी मध्ये सर्व सोयीसुविधा बंद असतील.