महाराष्ट्रात आगामी राज्यसभेच्या निवडणूकीमुळे (RS Elections) राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात 6 जागांवर राज्यसभेची निवडणूक 10 जून दिवशी होणार आहे. राज्यातील आमदारांचं संख्याबळ पाहता 5 जागांवर मार्ग मोकळा आहे पण सहाव्या जागेवरून सध्या अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत. सहावी जागा शिवसेना लढेल असे ट्वीट संजय राऊतांनी (Sanjay Raut) केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान राऊतांनी ट्वीट मध्ये या सहाव्या जागेवरून घोडेबाजार सुरू झाल्याचंही म्हटलं आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी छत्रपती उत्सुक आहेत. त्यांनी पाठिंब्यासाठी आमदारांना पत्र दिली आहेत. त्यात आता शिवसेनेने सहाव्या जागेसाठी दावा केला आहे त्यातच भाजप देखील सहाव्या जागेसाठी मोर्चेबांधणी करत असल्याने याबाबत चुरस आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे. हे देखील नक्की वाचा: Sambhajiraje: संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता, निवडणुकीसाठी शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचा दावा .
राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे. असं ट्विट करत संजय राऊत करत शिवसेनेचा एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती हातात शिवबंधन बांधणार का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी
महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल?
सहावी जागा शिवसेना लढेल.
कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे . जितेंगे. pic.twitter.com/VOXRKRDzdk
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 18, 2022
राज्यसभेचं निवडणूकीचं गणित काय सांगत?
राज्यसभेच्या निवडणूकीसाठि महाविकास आघाडीकडे 169 चं संख्याबळ आहे तर भाजपा कडे 113 आमदार आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. यानुसार शिवसेना, एनसीपी, कॉंग्रेस आपला एक उमेदवार सहज राज्यसभेवर पाठवू शकत आहे. भाजपा देखील 2 उमेदवार पाठवू शकत आहे पण सहाव्या जागेसाठी आता फोडाफोडी होण्याची शक्यता आहे.