Riteish Deshmukh | (Photo Credits: Facebook)

Vilasrao Deshmukh Smrutidin: राजकारणात एकेकाळी असलेली सभ्यता, भाषणांची उंची आज आपल्याला पुन्हा एकदा आणण्याची गरज आहे. राजकारणातील भाषणांचा आणि एकूणच भाषेचा दर्जा घसरला आहे. ते पाहून मनाला दु:ख होते. एकेकाळी आपल्याकडे दिग्गज नेते होते. ज्यांची भाषणं ऐकत राहायला पाहिजे असे वाटायचे, आता तसे दिसत नाहीत, असे उद्गार अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh Speech) यांनी काढले. या वेळी बोलताना माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh)यांच्या आठवणींने ते भावूक झाले. इतके की वडीलांच्या आठवणींनी त्यांना व्यासपीठावरच रडु कोसळले. ते हुंदके देऊन रडू लागले. या वेळी भाऊ आमदार धिरज देशमुख यांनी त्यांना सावरले. लातूर तालुक्यात असलेल्या निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर झाले. या वेळी आयोजित विलासराव देशमुख स्मृती सोहळ्या रितेश देशमुख बोलत होते.

'काका पुतण्यांच्या नात्याचे ज्वलंत उदाहरण'

भाषण करताना विलासराव देशमुख आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्यातील प्रेमळ संबंधांबात रितेश देशमुख बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले काका दिलीपराव देशमुख यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. काका पुतण्याचे नाते कसे असावे याचे ज्वलंत उदाहरण म्हणून तुम्ही आमच्याकडे पाहू शकता. हे सर्व मी विरासराव आणि दिलीपराव या दोन्ही भावांकडे पाहून शिकलो. या वेळी वडिलांच्या आठवणीने रितेश यांना अचानक रडू फुटले. त्यांनी अवंडा गिळायचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही. (हेही वाचा, Nilu Phule, Vilasrao Deshmukh & Maharashtra Bhushan: निळू फुले, विलासराव देशमुख आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार; काय घडलं नेमकं? घ्या जाणून)

काय म्हणाले रितेश देशमुख

विरासराव देशमुख यांना जाऊन आज 12 वर्षे झाली. पण असे वाटत नाही ते आपल्यात नाहीत. विलासराव आणि दिलीपराव यांनी नेहमीच भाऊ म्हणून एकमेकांना जपले. त्यांनी कधीही विचार केला नाही की, भावाकडून आपणास काय मिळेल. त्यांनी नेहमीच विचार केलाकी आपण भावाला काय देऊ शकतो. आजकालच्या समाजात अशा प्रकारचे बंधुप्रेम विरळ पाहायला मिळते. विलासराव गेल्यानंतर त्यांनी (दिलीपरावांनी) आम्हाला वडीलांची उणीव कधीही भासू दिली नाही. काका म्हणून ते नेहमी आमच्या पाठिशी उभा राहिले, असेही रितेश देशमुख म्हणाले. (हेही वाचा, Vilasrao Deshmukh 76th Jayanti: विलासराव देशमुख यांचे गाजलेले भाषण आणि गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थिती मिश्कील टोलेबाजी (पाहा व्हिडिओ))

व्हिडिओ

रितेश देशमुख यांनी सांगितला प्रसंग

आपल्या भाषणादरम्यान विलासराव देशमुख यांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, विलासराव पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले. त्या वेळी मांजरा सरकारी साखर कारखान्यावर त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते कारखान्यावर आले. कार्यक्रम सुरु होता. त्यांनी थेट व्यासपीठावर प्रवेश केला आणि दादांच्या पायावर डोके ठेवले. ते बोलण्यासाठी उभे राहीले पण भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. भाषण थांबले. काय करायचे कोणालाच काही कळत नव्हते. या वेळी काका पुढे आले. त्यांनी साहेबांना पाठीवर हात ठेवला आणि ते म्हणाले. 'कम ऑन यू डू इट'. एका भावाने दुसऱ्या भावाशी कसं वागावं याचं हे दुर्मिळ उदाहरण होते, असे रितेश या वेळी म्हणाले.