Republic Day 2020: 71 व्या प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे विशेष संचलन; मुंबई पोलिसांनी जारी केली Traffic Advisory
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Wikimedia Commons, Lakun.patra)

26 जानेवारी 1950 या दिवशी 10 वाजून 18 मिनिटांनी, डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान संपूर्ण देशात लागू करण्यात आले. हाच दिवस संपूर्ण भारत देशात प्रजासत्ताक दिन (Republic Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा देश 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या दिवसाचे औचित्य साधून देशभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) शहरामधील दादरच्या शिवाजी पार्क इथे प्रजासत्ताक दिनी विशेष कार्यक्रम पार पडतो. इथे होणाऱ्या विशेष संचलनामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) उद्यासाठी रहदारीमध्ये काही बदल (Traffic Advisory) केले आहेत.

शिवाजी पार्क येथे दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या संचलनामुळे, सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत शिवाजी पार्क येथील वाहतूक सुरळीत राहण्याकरीता खालील प्रमाणे वाहतुकीचे नियमन करण्यात आले आहे.

केळुसकर रोड जंक्शन, एनसी केळकर रोड व लेडी जमशेदजी रोड (गडकरी जंक्शन) ते केळुसकर रोड (दक्षिण व उत्तर) पर्यंत रोड वाहतुकीसाठी बंद असेल

> एस.के. बोले रस्ता सिद्धिविनायक जंक्शनपासून हनुमान मंदिर पर्यंत वन वे असेल. म्हणजे हनुमान मंदिरापासून पुढे प्रवेश नसणार.

> सिद्धिविनायक जंक्शनपासून हिंदुजा हॉस्पिटल पर्यंत एसव्हीएस मार्ग वाहन वाहतुकीसाठी बंद असेल (स्थानिक रहिवासी रस्ता क्रमांक 5 पर्यंत जाऊ शकतात).

> माहीम जंक्शनपासून सिद्धिविनायक मंदिर पर्यंत एसव्हीएस मार्ग, वाहन वाहतुकीसाठी बंद असेल.

> टकांडस एच. कटारिया रोड, एलजे रोड ते हिंदुजा हॉस्पिटल पर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असेल.

पोलिस, बीएमसी, पीडब्ल्यूडी आणि इतर शासकीय कर्मचार्‍यांसाठी तसेच बंदोबस्तासाठी येणाऱ्या वाहनांचे पार्किंग स्वातंत्र्य वीर सावरकर स्मारक, वनिता समाज सभागृह, महात्मा गांधी जलतरण इथे  होईल. (हेही वाचा: देशातील 1040 पोलीस कर्मचाऱ्यांना President's Police Medal जाहीर; महाराष्ट्रातील 54 जणांचा समावेश)

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील पथसंचलनात केंद्राने नाकालेला ‘स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग - कान्होजी आंग्रे’ हा महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Tableau) ठाकरे सरकारने (Thackeray Government) स्वीकारला आहे. 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुंबईमधील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या पथसंचलनात या चित्ररथाची झलक दाखवण्यात येणार आहे.