महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागू होण्याची शक्यता आहे. जिल्हा स्तरावर स्थानिक प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध लादले जात आहेत. दरम्यान, बीड (Beed) जिल्ह्यातही 26 मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे बीड येथील लॉकडाऊनच्या निर्बंधामध्ये सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. यासंदर्भात बीडचे पालकमंत्री सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, अनेक व्यापारी संघटनांनी धनंजय मुंडे यांनी भेट घेतली होती. तसेच आपली आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीमध्ये निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. याचबरोबर नागरिकांनी योग्य ती जबाबदारी घेण्याचेही त्यांनी आवाहन केले आहेत. हे देखील वाचा- जेजुरी खंडोबाच्या दर्शन वेळेत बदल; जाणून घ्या नवी वेळ
ट्वीट-
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत शिथिलता देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जनतेनेही आपली जबाबदारी ओळखून करोना विषयक नियमांचे पालन करावे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 29, 2021
महाराष्ट्रात आज तब्बल 31 हजार 643 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 102 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27 लाख 45 हजार 518 पोहचली आहे. यापैकी 23 लाख 53 हजार 307 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 54 हजार 283 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 3 लाख 36 हजार 584 रुग्ण सक्रीय आहेत.