मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) वाहतुक ठप्प झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना प्रवासात मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावर यापुर्वीच असलेल्या खड्ड्यांमुळे गणेशोस्तवासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागला होता. आता गणेशोत्सव साजरा करुन परतणाऱ्या नागरिकांना देखील मोठा त्रास हा वाहतुक कोंडीमुळे सहन करावा लागत आहे. (हेही वाचा - Aaditya Thackeray यांची महाराष्ट्र भाजप, शिंदे गटाकडून होत असलेल्या 'आदु बाळ' उल्लेखावर पहिल्यांदा प्रतिक्रिया समोर)
काल दुपारी 3 वाजता झालेल्या अपघातानंतर मुंबईवरून कोकणात जाण्यासाठी काही एक्सप्रेस ट्रेन सोडण्यात आल्या. यावेळी उत्तरेकडून देखील काही एक्सप्रेस ट्रेन आल्या. सध्या 17 ते 18 ट्रेन गेल्या 13 तासांपासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. गेल्या 12 ते 13 तासांपासून प्रवासी ट्रेनमध्येच अडकले आहेत. सध्या नावडे रोड रेल्वे स्थानकात दादर-सावंतवाडी ही एक्सप्रेस ट्रेन उभी आहे.
मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली असून मोठी वाहतुक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर बोरगाव घाटात ट्राफिक जाम झाले आहे.