Dombivli Gangrape Case: डोंबिवली सामूहिक बलात्कारप्रकरणी रामदास आठवले यांचे खळबळजनक विधान
Ramdas Athawale (Photo Credits: Facebook)

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी सामूहिक बलात्कार (Dombivli Gangrape Case) केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले होते. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला असून पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणींनी जोर धरला आहे. यातच डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिताच्या कुटुंबियाच्या जिवाला धोका आहे, असे खळबळजनक विधान रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे.

रामदास आठवले यांनी डोंबिवली सामूहिक बलात्कार पीडिताच्या कुटुंबियाची भेट घेतली. तसेच त्यांनी पीडिताच्या आई- वडिलांच्या हाती एका लाख रुपयांचा चेक दिला. रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, पीडिताचे डोंबिवलीत भाड्याने घर होते. त्यांना आता त्या घरात जाता येत नाही. तसेच पीडिताची लहान बहीण इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. एवढेच नव्हेतर, पीडित मुलीच्या सर्व कुटुबियांच्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पीडिताच्या कुटुंबियांना म्हाडातर्फे घर देऊन सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्यात यावी, अशीही रामदास आठवले यांनी केली आहे. टीव्ही9 मराठीने यासंदर्भात माहिती दिली आहे. हे देखील वाचा- गांधी जयंती दिवशी महेश मांजरेकर यांच्याकडून 'गोडसे' सिनेमाची घोषणा; जितेंद्र आव्हाड यांची संतप्त प्रतिक्रीया (View Tweet)

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे, नायब तहसीलदार सुषमा बांगर, रिपाई जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव, डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, दयाळ बहादूर, डी एम मामा चव्हाण, अण्णा रोकडे, घनश्याम चिरणकर, मीना साळवे, रामा कांबळे आणि भारत सोनवणे उपस्थित होते.

पीडिताच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे त्याने अनेकदा तिला ब्लॅकमेल केले. दरम्यान, फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. मात्र, गेल्या 8 महिन्यांपासून सुरु असलेल्या लैंगिक अत्याचाराला वैतागून पीडिताने अखेर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.