भारतासह महाराष्ट्रातही दाखल झालेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसची दहशत नागरिकांमध्ये आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी कोरोनाला भारतातून पळवून लावण्यासाठी 'गो कोरोना गो...' अशा घोषणा दिल्या. आठवलेंच्या या घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर प्रतिक्रीयांचा भडीमार सुरु आहे. या व्हिडिओवरुन आठवलेंवर टीका देखील होत आहेत. या टीकाकारांना रामदास आठवले यांनी देखील आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. 'गो कोरोना' नाही, तर मग काय 'कम कोरोना' म्हणू का?' असा संतप्त सवाल त्यांनी टीकाकारांना केला आहे. कोरोना व्हायरस हटवण्यासाठी रामदास आठवले यांनी अवलंबला 'हा' अनोखा उपाय (Watch Video)
कोरोना गो नाही, तर मग काय 'कोरोना ये' असं म्हणणार का? 'कोरोना कम' असं मी म्हणणार नाही. मी 'गो' असंच म्हणेन. यावरुन टीका करण्याची काहीच आवश्यकता नाही, असंही ते म्हणाले. गो कोरोना म्हणजे कोरोना व्हायरसने भारतातून जावं, येथे येऊ नये. तसंच आला असेल तर जावं, म्हणून मी 'गो कोरोना' असं म्हणालो, अशा शब्दात त्यांनी आपली बाजू मांडली आहे.
"Corona Go, Go Corona" आठवलेंचा व्हिडिओ सोशल मिडीयवर व्हायरल; नेटकऱ्यांनी केल ट्रोल - Watch Video
मुंबईमध्ये कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करणाऱ्या चीनी नागरिकांची रामदास आठवले यांनी भेट घेतली. त्यावेळेस चीनचे भारतातील काऊन्सील जनरल तांग गुइलाई हेही तेथे उपस्थित होते. या संकटात चीन-भारत संबंध अधिक घट्ट होतील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी चीनी नागरिकांसमवेत 'गो कोरोना गो...' अशी घोषणाबाजी केली होती.