Chhatrapati Shahu On Sambhajiraje: संभाजीराजे यांच्या उमेदवारीवरुन शाहू छत्रपती यांचे खडेबोल, शिवसेनेच्या भूमिकेचेही समर्थन; फडणवीस यांच्याबद्दल गौप्यस्फोट
Chhatrapati Shahu, Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यसभेच्या उमदवारीवरुन शिवसेनेवर केलेली टीका आणि व्यक्त केलेली भूमिका यावरुन त्याचे वडील शाहू छत्रपती (Chhatrapati Shahu) यांनी खडेबोल सुनावले आहेत. शिवसेनेने काहीही चुकीचे केले नाही. जर उमेदवारी नाकारली असेल तर ते वैयक्तीक आहे. त्यातात घराण्याचा अनादर झाला असे म्हणता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दात छत्रपतींनी कान टोचले आहेत. यासोबतच संभाजीराजे यांनी अपक्ष लढावं ही तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी होती, असा गौप्यस्फोटच शाहू छत्रपती यांनी केला आहे. महत्तवाचे म्हणजे 'संभाजीराजेंना उमेदवारी दिली नाही म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान केला असं होत नाही. संभाजीराजेंची ती राजकीय भूमिका होती', असे स्पष्ट शब्दात शाहू छत्रपती यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता भाजप आणि संभाजीराजे यांच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे. ते पत्रकारांशी अनौपचारीक  गप्पा मारत होते.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यानी आपल्याला दिलेला शब्द फिरवला असे संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या प्रत्येक विधानावरुन शाहू छत्रपती यांनी खडेबोल सुनावले आहेत. कोणत्याही बैठकीतील ड्राफ्ट म्हणजे कच्चा मसुदा असतो. त्यावर जेव्हा एकमेकांच्या स्वाक्षऱ्या होतात, शिक्कामोर्तब होते तेव्हाच त्याला अंतिम रुप येते आणि ते एक कागदपत्र बनते. त्यामुळे त्या ड्राफ्टला कोणताही आधार नाही. अशा ड्राफ्टच्या आधारे बलू नये. राज्यसभेची स्वीकारलेली उमेदवारीही आम्हाला फारशी आवडली नव्हती. मात्र 2009 पासून त्यांचे निर्णय (संभाजीराजे) व्यक्तीगत होऊ लागले होते, असेही शाहु छत्रपती यांनी म्हटले. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2022: संभाजीराजे छत्रपती यांचा पत्ता कट? शिवसेनेकडून राज्यसभेसाठी कोल्हापूरचे संजय पवार रिंगणात उतरण्याची शक्यता)

दरम्यन, संभाजीराजे यांना जर राज्यसभा लढवायचीच होती तर त्यांनी सर्व पक्षीयांच्या गाठीभेटी घ्यायला हव्या होत्या. त्यात ज्यांच्याकडे जास्त मते आहेत त्यांना भेटायला हवे. त्यांनी तसे काही केले नाही. किमान आगोदर आम्हाला सांगतले असते तहीही काही तोडगा काढता आला असता, अशा थेट शब्दात शाहू छत्रपती यांनी खडेबोल सुनावले आहेत.