Rajendra Mulak | X

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी दरम्यान  बंडखोरी केल्याने राजेंद्र मूळक (Rajendra Mulak) यांच्यावर कॉंग्रेसने (Maharashtra Congress) निलंबनाची कारवाई केली होती पण आज ( 1 जुलै) काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथाला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थित मुळक यांनी पक्षात प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीत रामटेकची जागा कॉंग्रेसने ठाकरे गटाला सोडल्याने त्यांनी बंडखोरी केली होती.  रामटेक मतदारसंघात राजेंद्र मुळक यांनी अपक्ष निवडणूक लढवून मविआ ची कोंडी झाली होती. विधानसभा निवडणूकीमध्ये  याठिकाणी ठाकरे गटाने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली. पण या मतदारसंघात ना ठाकरे गट, ना अपक्ष राजेंद्र मुळक जिंकले. महायुतीकडून रामटेक वर आशिष जयस्वाल यांचा विजय झाला होता.

राजेंद्र मुळक यांचे निलंबन मागे

राजेंद्र मुळक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये वित्त आणि नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, संसदीय कामकाज आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री होते.