Pulwama Terror Attack: शहीद CRPF जवान ठरत आहेत राजकीय बळी- राज ठाकरे यांची मोदी सरकारवर टीका
मनसे (Photo credit: IANS)

Raj Thackeray Kolhapur Visit: पुलवामा दहशतवादी हल्ला (Pulwama Terror Attack)  झाल्यानंतर देशभरात संताप आणि रोषाचं वातावरण आहे. मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद राजकीय बळी ठरत असल्याचा घणाघाती आरोप राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी कोल्हापूरच्या एका सभेत केला आहे. अजित डोवाल(Ajit Doval)  यांची कसून चौकशी करा म्हणजे सारं राजकारण बाहेर पडेल अशी मागणी राज ठाकरे यांनी बोलताना केली. तसेच आगामी दिवसात भारत विरुद्ध पाकिस्तान असा चित्र उभं करून मतदारांचं लक्ष मोदी सरकारच्या (Modi Government) घोटाळ्यांवरून हटवले जाईल असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

राज ठाकरे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांनी एक सभा घेतली. यामध्ये भाजप सरकारवर टीका करताना मतदारांच्या कमकुवत स्मरणशक्तीचा भाजप फायदा घेणार आहे. राफेल घोटाळा, नोटाबंदीचा आर्थिक फटका यापासून आपलं लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार आता पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर खोटा शत्रू उभा करून अशा काही गोष्टी घडवून आणतील की मतदारांना जुन्या गोष्टींचा विसर पडेल. योग्य वेळ आली की मतदानाच्या प्रचारसभेत या बाबत अधिक विस्ताराने बोलेन असेही राज ठाकरे म्हणाले.

14 फेब्रुवारीच्या दुपारी सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर 40  जवान जागीच ठार झाले. यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.