कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कृष्णकुंज येथे पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य करता असताना त्यांनी या काळात नागरिकांनी धीराने गांभीर्याने वागणे अत्यावश्यक आहे असे सांगितले. पोलीस, वैद्यकीय कर्मचारी हे जनतेसाठी अहोरात्र राबत आहेत, मात्र काही ठिकाणी या कर्मचार्यांवरच हात उगारून हल्ले करण्याचे प्रसंग घडत आहेत, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार (Black Marketing) करण्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत, आजाराची माहिती लपवून रोग पसरवण्याची विकृती सुरू आहे, अशाप्रकारे नियम मोडणार्या सर्वांवर कडक करावी केली गेली पाहिजे, त्यांना फोडून काढा, गोळ्या झाडा, ठेचून मारून टाका आणि हे व्हिडीओ सुद्धा व्हायरल करा अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याशिवाय राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे जाणून घ्या..
- देशातील मुस्लिम बांधवांची सध्याची भूमिका काहीशी संशयास्पद आहे, देशावर संकट असताना सुद्धा मरकजचे आयोजन, पोलिसांवर केलेले हल्ले, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसमोर अश्लील चाळे, नोटांना थुंकी लावणे, भाज्यांवर थुंकणे एक ना अनेक प्रसंगातून विकृती आढळून येत आहे. जर हीच वागणूक कायम राहणार असेल तर त्यांना वैद्यकीय सुविधा तरी का द्याव्यात? उलट या सर्वांंना गोळ्या झाडुन ठेचुन मारुन टाकायला हवे.
-मौलवी- मौलाना यांनी प्रबोधन करायला हवे, निवडणूक काळात मतदान करा असे आवाहन करणाऱ्या मौलवींचे हे सुद्धा के कर्तव्य आहे.
- लॉक डाऊन देशात काही दिवस असणार आहे पण जर का या अशा विकृतांचे वर्तन थांबले नाही तर लॉक डाऊन नांतर आम्ही देशात असणार आहोत त्यावेळी त्यांना कसा धडा शिकवला जाईल हे लक्षात ठेवावे.
- लोकांची एक चूक सर्वांनाच महाग पडू शकते, हे अजूनही लोक समजून घेत नाहीयेत हे दुर्दैवीच म्हणता येईल.
- लोकांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीविषयी, लॉक डाऊनचा कालावधी वाढण्याविषयी संभ्रम आहेत हे मान्यच आहे, मात्र हे संभ्रम दूर करण्यासाठी सत्ताधार्यांनी प्रयत्न करायला हवेत. तसेच यानंतरच्या काळात आर्थिक मंदी येऊ शकते यावेळी उद्योगांसाठी काय उपाययोजना केल्या जातील याविषयी पंतप्रधानांनी बोलायला हवे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून लोकांना दिवे लावायला सांगितले, अर्थात आता लोक सुद्धा रिकामेच आहेत त्यामुळे ते तसे दिवे लावतील सुद्धा मात्र जो आशेचा किरण मोदींनी द्यायला हवा होता तो अजूनही अस्पष्ट आहे. दिवे लावण्याचा श्रद्धा अंधश्रद्धेनेच मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी, कोरोना जर का अशा पद्धतीने जाणार असेल तर उत्तमच आहे.
- महाराष्ट्र पोलिसांच्या कामाचे कौतुक आहे, त्यांनी राज्यातील परिस्थिती शक्य तितकी नियंत्रणात ठेवली आहे. महाराष्ट्रात मुख्यतः मुंबईत असणारी ही शांतता 92 -93 च्या दंगलीत सुद्धा पाहायला मिळाली नव्हती. मात्र तरीही जे पोलिसांवर हाळी करत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे अशांवर कडक कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांच्याशी संवाद साधला आहे.
- या संकटकाळात सरकारला सहकार्याची आवश्यकता आहे, लोकांनी आपली वागणूक नियमानुसार ठेवल्यास लवकरच हे संकट सुद्धा दूर होईल.
दरम्यान,महाराष्ट्रात खरोखरच आता संकटाचा काळ आहे देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. अशावेळी नागरिकांना वारंवार घरी राहून लॉक डाऊनचे पालन करण्यास सांगितले जात आहे. जर का 15 एप्रिल पर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर लॉक डाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो असे संकेत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.