महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नागपूर (Nagpur) येथे भेट घेतली. राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत. तर, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व सरकार आणि विरोधकही आगोदरच नागपूरमध्ये आहेत. राज ठाकरे हे आज रात्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेचा पुरेसा तपशील बाहेर आला नाही. भेटीपूर्वी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे स्वागत केले.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यापूर्वी अनेकदा भेट घेतली आहे. या भेटीच्या त्या त्या वेळी जोरदार चर्चाही झाल्या आहेत. त्यातील काही भेटींचा तपशील प्रसारमाध्यमांतून बाहेर आला. मात्र, नागपूर यतेली भेटीचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. या नेत्यांमध्ये वारंवार होत असलेल्या चर्चांमुळे भाजप मनसे यांच्यातील जवळीक अधिक वाढत असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जवळी अधिक महत्त्वाची मानली जात आहे. (हेही वाचा, Raj Thackeray यांचे कार्यकर्त्यांना पक्षशिस्तीचे आवाहन; पक्षांतर्गत बाबींवर माध्यमांमध्ये बोलण्यास मनाई)
राज ठाकरे यांनी नागपूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी विरोधकांसह सत्ताधारी आणि इतर सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप, काँग्रेस या राजकीय पक्षांना राजकीयदृष्टा स्थिर होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. आता मनसेही संघर्ष करत आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, कार्यकर्त्यांसमोर भाषण झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी मनसे आमदार राजू पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अजित अभ्यंकर आदी नेते उपस्थित होते.