Raj Thackeray: राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी, गुणरत्न सदावर्तेंकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सध्या महाराष्ट्रातील टोल प्रश्न (Toll Issue) हाती घेतला असून त्याविरोधात मोहिम हाती घेतली आहे. पंरतू आता त्यांच्या या आक्रमकपणामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे  यांच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) केली आहे. 'टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीने अटक करा' अशी लेखी तक्रार त्यांनी केली आहे. तसंच मुलुंड टोल नाका जाळल्या प्रकरणी देखील राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे. (हेही वाचा - MNS Protest Against Rise In Toll: राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक उतरले रस्त्यावर; विना टोल वाहने सोडणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड)

कष्टकरी जनसंघाच्यावतीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी म्हटले की,  महाराष्ट्रात मराठी गुजराती आणि उत्तर प्रदेशातील लोक मिळून राहतात. महाराष्ट्र हा कोण्या एकट्याचा नसल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या घरी बसून काही वक्तव्य केले. ते म्हणाले, ''महाराष्ट्रात अशी हिंसा आणि राज ठाकरेंची दादागिरी चालवून घेणार नाही डंके की चोट पे सांगत आहोत की, काही झालं तर राज ठाकरेच जबाबदार आहेत.''

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये टोल संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले होते. आणि मनसैनिकाने पनवेल, वाशी व मुलुंड टोल नाक्यावर आंदोलन ही केलं. काही चार चाकी वाहनांना मनसे कार्यकर्त्यांनी टोल न भरता सोडलं होत.