RajThackeray (Photo Credits: File Photo)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज भारताने 'मिशन शक्ती'च्या (Mission Shakti) माधयमातून ए सॅट मिसाईल निर्माण करत अंतराळामध्ये भारतीय वैज्ञानिकांनी केवळ 3 मिनिटांमध्ये 300 किमी दूर असलेल्या लो ऑर्बिट सॅटेलाईटला लक्ष केल्याची माहिती दिली. भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीचं देशाच्या विविध स्तरांमधून कौतुक होत आहे. मात्र ही बातमी सांगण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी समोर येणं हे मात्र त्यांना खटकलं. नरेंद्र मोदींच्या या प्रकारावरून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्यांना लक्ष्य केलं आहे. देशाच्या शास्त्रज्ञांचं कामं कौतुकास्पद आहे पण ते वैज्ञानिकांना सांगू द्या, त्यांना प्रसिद्धी मिळू द्या असं म्हणतं त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

राज ठाकरे ट्विट  

अंतराळामध्ये अशाप्रकारची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश आहे. यापूर्वी अमेरिका, चीन, रशिया या ंनी अशाप्रकारची कामगिरी केली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अंतराळातील ही कामगिरी फार महत्त्वाची ठरणार आहे.

नरेंद्र मोदी ट्विट

आज नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून भारतीयांना एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे अशाप्रकारे माहिती दिली होती. त्यानंतर सुमारे तासाभराने भारत अंतरिक्ष महासत्ता बनला असल्याचं म्हटलं आहे.