
Maharashtra weather update: राज्यभरात बऱ्याच दिवसापासून पावसाने दडी मारल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याच कारणांमुळे आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर,गडचिरोली, नागपूर या पाच जिल्ह्यांत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावासाची परिस्थिती पाहता हवामान विभागाने आज पूर्व विदर्भातील काही भागात येलो अलर्ट दिला होता. मात्र, बदलती परिस्थिती पाहता हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट दिला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. तर शेतकरी आता जोरदार पावसाची वाट पाहत आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. आज मेहगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
२१ ऑगस्ट पर्यंत विदर्भात पावसाची शक्यता आहे. आज शनिवारी सकाळी ८ पर्यंत पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसाअभावी अनेक जिल्ह्यात शेती रखडलेली पाहायला मिळाली. पुढील तीन दिवस हे मुसळधार पावसाचे असणार आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाने सुरुवात केली. नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसांत वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.