काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिवंगत हिंदुत्ववादी विचारवंत व्ही डी सावरकर यांच्याविरोधात केलेले वक्तव्य मागे घ्यावे आणि महाराष्ट्रात येण्यापूर्वी माफी मागावी, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी शुक्रवारी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी मुंबईत येण्याच्या शक्यतेबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना बावनकुळे उत्तरे देत होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) च्या बॅनरखाली सरकार स्थापन केले.
गेल्या वर्षी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे हे सरकार पडले आणि शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भाजपने राहुल गांधींवर सावरकरांचा वारंवार अपमान केल्याचा आरोप केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी मातोश्रीवर गेल्यास आमची हरकत नाही. त्यांनी वारंवार आणि जाणीवपूर्वक सावरकरांना लक्ष्य केले. त्यामुळे महाराष्ट्रात येण्यापूर्वी त्यांनी माफी मागावी आणि सावरकरांविरुद्ध केलेले वक्तव्य मागे घ्यावे.
विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्याच्या त्यांच्या पक्षाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांच्या संभाव्य भेटीची चर्चा सुरू झाली. गेल्या महिन्यात मालेगाव येथील एका सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ते सावरकरांची पूजा करतात आणि काँग्रेस नेत्याने त्यांचा अपमान करणे टाळावे. हेही वाचा Sanjay Raut On BJP: संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले - हे टोळी चालवत आहेत
लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी एमव्हीएची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी संघटितपणे काम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधींना जाणूनबुजून भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. राहुल गांधी गेल्या महिन्यात म्हणाले होते, 'माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.'