Image Credit: X

Pune Weather Prediction, June 27: आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई,पुणे तसेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.  आज, 26 जून 2024 रोजी पुण्यातील तापमान 27.06 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.62 °C आणि 30.25 °C दर्शवतो.राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या पावसाचा जोर वाढला आहे. कुठं जोरदार पाऊस पडतोय, तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. अशात हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.तर पुण्यात ही गेल्या काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, पुण्यात यावर्षी जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.मान्सूनपूर्व आणि मोसमी सरींनी महाराष्ट्रात चांगला पाऊस पाडला आहे. अनेक भागात, विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 1 जून ते 15 जून दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. आता पुंयात उद्याचे हवामान कसे असतील ह्याचा हवामान खात्याने अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather Forecast For Tomorrow : मुंबईत उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज

 

पुण्यात उद्याचे हवामान कसे पहा:

दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्या भागात चांगल्या पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी कर नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.भारतीय हवामान खात्याने (IMD) पुण्यासह किमान सहा जिल्ह्यांमध्ये गेल्या 3 दिवसणपासून पुढील पाच दिवसांसाठी पिवळ्या ते ऑरेंज अलर्ट चा इशारा अपडेट केला होता. तसेच 25 आणि 26 जून रोजी पुण्यासह सहा जिल्ह्यांना अतिवृष्टीच्या हालचालींसाठी ऑरेंज अलर्ट प्राप्त झाला होता.