
Pune Weather Prediction,July3: पुणे शहरात आज सकाळ पासूनच पावसाची सुरवात झाली आहे. पुणेजिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशार देण्यात आला आहे.पूण्यात आज 2 जुलै 2024 रोजी तापमान 26.73 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23.73 °C आणि 28.0 °C दर्शवतो. पुणेच्या घाट विभागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.पुणे व आजूबाजूच्या परिसरात चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे घाट विभागासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होत असून पुढील दोन दिवस महत्त्वाचे असल्याची माहिती आहे. राज्यात आता मान्सून पूर्ण पणे सक्रिय होताना दिसत आहे. पुणे मधील हवामान विभागाचे प्रमुख घोसाळीकर म्हणाले आहेत आम्ही पुढील 5 दिवस जोरदार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. ठाणे,रायगड,पुणे, रत्नागिरी,सिंधुदुर्ग,नाशिक या सर्व जिल्हयानमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच या जिल्हयान मध्ये यल्लो अलर्ट सुद्धा जारी केला आहे. आता उद्या पुण्यात नेमके कसे हवामान असतील ह्यासाठी हवामान खात्याने पुण्याचे उद्याचे हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा : Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आज असं राहील वातावरण, वाचा हवामान अंदाज
महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाचा पट्टा आज स्थिर आहे. कोकण गोव्यात पुढील पाच ते सात दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे