Pune Weather Prediction, August 13: पुण्यात आज 13 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 27.65 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22.62 °C आणि 29.6 °C दर्शवतो. आज पुण्यात एकदम हलक्या पावसाचा अंदाज आहे.भारतीय हवामान खात्याने (IMD) आपल्या कलर-कोडेड अलर्टमध्ये 14 ऑगस्टपर्यंत पुण्यासाठी नो वॉर्निंग चा हिरवा रंग सूचित केला आहे आणि 15 ऑगस्टपर्यंतच्या आठवड्यात शहरात हलका ते अतिशय हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.पुढील आठवडाभर पुणे शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे,” असे IMD, पुणे येथील हवामान आणि अंदाज विभागाच्या प्रमुख मेधा खोले यांनी सांगितले.हवामान अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, आयएमडी मॉडल्सने सूचित केले आहे की पश्चिमेकडील वारे कमकुवत होत आहेत आणि मान्सूनचा प्रवाहही उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे 12 ऑगस्टपासून पावसाच्या हालचाली किरकोळ कमी होतील आणि घाट विभागातही पावसाचा जोर कमी होईल. यावेळी आकाश प्रामुख्याने ढगाळ राहील आणि पुण्यात वेळोवेळी 2.5 ते 15 मिमी पाऊस पडू शकतो. ह्या आठवढ्यात पावसाचा वेग कमी असेल मात्र पुढच्या आठवढ्या पासून पुण्यात पावसाचा जोर पुन्हा वाढेल. आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने पुणे शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Pune Weather forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने ओढ दिली आहे. जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पाऊस होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला आहे. कोकणात व मध्य महाराष्ट्रात आज काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.