Pune: ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांचे 76 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
साहित्यिक नंदा खरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

ज्येष्ठ साहित्यिक अनंत यशवंत ऊर्फ नंदा खरे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. खरे यांचा जन्म 2 ऑक्टोबर, 1946 रोजी नागपूर येथे झाला. नंदा खरे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते व त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. नंदा खरे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपूरात झाले होते, त्यांनंतर त्यांनी मुंबईतील आयआयटी या संस्थेत सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेऊन त्यांनी काही काळ एका खासगी कंपनीत काम केले होते. त्यांच्या 'उद्या' नावाच्या कादंबरीसाठी त्यांना 2020 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता, परंतु त्यांनी तो नाकारला होता. मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिले असे म्हणत त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. त्यांच्या ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ या त्यांच्या कादबंऱ्या विशेष गाजल्या.