Pune Shocker: पुण्यात 39 वर्षीय महिला सहकर्मचारीला 70 वर्षीय व्यक्तीने जबरदस्ती केलं 'किस'; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुण्यामध्ये (Pune) 70 वर्षीय व्यक्तीने त्याच्या महिला साथीदाराला जबरदस्तीने किस (Kiss) केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये तिच्यासोबत छेडछाड करत जबरदस्तीने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीचं नाव राजीव विळेकर आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, हा प्रकार घोले रोड वरील महात्मा फुले आर्टिफॅक्ट्स म्युझियम जवळ घडला आहे. यामुळे पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. सध्या या घटनेप्रकरणी डेक्कन पोलिस स्टेशन (Deccan Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडीत महिला 39 वर्षीय आहे. 13 डिसेंबरच्या दिवशी कामाच्या वेळेतच सकाळी 11 वाजता तो आला. फोन वर बोलता बोलता त्याने त्याच्या डेस्कच्या मागील पडदे बंद केले. त्याच्या जवळ असलेल्या महिलेकडे त्याने चुंबनाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर त्याने जबरदस्ती केली. नंतर महिलेला आक्षेप असेल तर दरवाजा बंद करण्याचा देखील सल्ला दिला.

दरम्यान या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी असलेल्या Sexual Harassment च्या निर्बंधांचे उल्लंघन झाले होते. अशा घटनांमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावं म्हणून विशेष प्रयत्न केले जावेत यासाठीचे नियम करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाले आहेत. नक्की वाचा: मुंबई: पाटलाग करुन तरुणीचे जबरदस्तीने चुंबन; आरोपीला अटक .

नोव्हेंबर महिन्यात असाच एक प्रकार झाला होता. ज्यामध्ये महिला बहिणीसोबत कॉस्मॅटीक विकत घेत असताना एकाने तिला मागून मिठी मारली होती. 4-5 सेकंद आरडाओरड करूनही कोणी मदतीला येऊ शकले नाही. ही घटना 26 नोव्हेंबरची होती.