Pune Rains. | Representational Image. (Photo Credit: PTI)

Pune Rains Update:  पुणे शहर आणि नजिकच्या परिसरात मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी (26  सप्टेंबर)  रात्री जोरदार पाऊस बसरल्याने या अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. पावसाच्या या रौद्र रूपामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहे. पुण्यातील पूर सदृश्य स्थितीत  9 जणांनी जीव गमावला आहे. पुण्यातील अरण्येशवर भागात टांगेवाले कॉलनीमध्ये 5 मृतदेह हाती आले आहेत तर 3-4 जण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्यासोबतच भोर, बारामती भागामध्येही  आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केले आहे. सद्ध्या पुण्यात पावसाचा जोर ओसरला असून पाण्याचा निचरा होण्यास सुरूवात झाली आहे. पुणे शहरात पावसाने धोक्याची पातळी ओलांडली; 500 कुटुंबांचे स्थलांतर, मुठा नदीला पूर

ANI Tweet  

बुधवार रात्री झलेल्या मुसळधार पावसामुळे कात्रज परिसरात नव्या बोगद्याजवळ महामार्गावर दरड कोसळल्याने पुणे- बेंगलोर या महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही त्याचा परिणाम झाला आहे. शहरातील सोसायट्या, घरे आणि वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे बचाव पथकांकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. दत्तवाडी भागात नाल्याच्या पुराचा जनावरांनाही फटका बसला आहे. नाल्याजवळ असलेल्या गोठ्यात आठ गाई आणि म्हशी दगावल्या आहेत.

पुण्यासोबतच भोर, बारामती भागामध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुरंदर तालुक्यातील नारायणपुर मध्ये पावसचा जोर कायम असल्याने पाणी अनेक गावामध्ये शिरले आहे. नदीला दुथडी भरून वाहत असल्याने सासवड ते नारायणपूर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. हवामान खात्याने नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.