पुणे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करत एका दिवसात वसूल केले 19.65 लाख
Representational Image (Photo Credits: PTI)

रेल्वेतून फुकट प्रवास करणा-या महाभागांची संख्या काही कमी नाही. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी पुणे रेल्वे प्रशानसनाने धाडसी पाऊल उचलत दंडात्मक कारवाई केलीय. या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे या कारवाईत त्यांनी एका दिवसात तब्बल 19.65 लाख वसूल केले. पुणे रेल्वे (Pune Railway) प्रशासनानच्या आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून यात त्यांनी याआधी केलेले दंडात्मक वसूलीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

रेल्वेने विनातिकिट प्रवास करणा-या प्रवाशांना रेल्वे फलाटावर किंवा रेल्वेमध्ये येणारे टीसी चांगलीच अद्दल घडवतात. अशा वेळी त्यांच्याकडून रकमेच्या स्वरुपात दंडात्मक कारवाई वसूल केली जाते. हेच पाऊल पुणे रेल्वे प्रशासनाने देखील उचलले होते. यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यात 24 ऑक्टोबर 2019 ला पुणे रेल्वे प्रशासनाने 19.65 लाख रुपये इतकी दंडात्मक वसुली केली. ही रक्कम मागील वर्षी 5 नोव्हेंबर 2018 रोजी वसूल केलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे.

हेदेखील वाचा- रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळवण्यासाठी 'या' सोप्या स्टेप्स जाणून घ्या

5 नोव्हेंबर 2018 रोजी 17 लाख 70 हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. याचाच अर्थ 2019 मधील केलेली कारवाई ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई होती. या कारवाईमध्ये आर.डी.कांबळे, एन.एन.तेलंग, बी.के.भोसले, एस.वी.लावंडे आणि अमोल सातपुते यांचा रेल्वे टीसींचा समावेश आहे. यांना कौतुकाची पावती म्हणून प्रत्येकी 1 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली आहे. तसेच रेल्वे प्रबंधक मिलिंद देऊस्कर यांनी या लोकांचा सत्कार देखील केला.

अलीकडेच रेल्वेने प्रवास करण्यासाठी सध्या प्रशासनाकडून ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा रांगेत उभे राहण्यासह डिजिटल पद्धतीला चालना मिळावी म्हणून ही सोय करुन देण्यात आली आहे. मात्र काही वेळेस बुकिंग केलेले तिकिट रद्द करण्याची वेळ आल्यास प्रवाशाला रेल्वेस्थानकातील तिकिट खिडकीवर जाऊन ते कॅन्सल करावे लागते. त्यासाठी पुन्हा वेळ वाया जातो. त्याचसाठी आता रेल्वे प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेले ई-तिकिट रद्द करण्याठी नवी सुविधा सुरु केली आहे. त्यानुसार प्रवाशाला ई-तिकिटाचे रिफंड मिळण्यासाठी फक्त एका OTP चा वापर करावा लागणार आहे.