पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये आजपासून 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींंना एकत्र जमण्यास बंदी
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पुणे, पिंपरी चिंचवड या भागात कोरोना व्हायरसचे रूग्ण अधिक प्रमानात आढळत असल्याने आता या भागामध्ये विशेष काळजी घेतली आहे. कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश आता या भागात अधिक कडक केले जाणार आहेत. दरम्यान पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार आता पुणे शहरात 4 पेक्षा अधिक लोकं एकत्र जमू नये याची खात्री करण्यासाठी पुणे शहर पोलिस आणि पिंपरी चिंचवड पोलिस सज्ज राहणार आहेत. त्यामुळे आता पुण्यात कॅम्प्स, खाजगी शिकवणी, ट्रेनिंग अशा गोष्टींवर बंधनं येणार आहेत. तसेच सरकारी मिटींगदेखील महत्त्वाची गोष्ट वगळता करता येणार नाही.

नव्या आदेशानुसार कोणत्यही संस्कृतिक, धार्मिक किंवा इतर कारणांसाठी 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत. यामध्ये सहली, ट्रेनिंग्स, खेळ, स्पर्धा, आंदोलनं यांचादेखील समावेश आहे. मात्र हा नियम सरकारी, निम सरकारी कार्यालयं, बस, रेल्वे स्थानकं, हॉस्पिटल, क्रिटिकल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इंफ्रास्ट्क्चर प्रोजेक्ट,वृत्त वाहिन्या, वर्तमानपत्र कार्यालयं यांना वगळण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये सहभाग नसलेल्या संस्थांना, खाजगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम चे आदेश देण्याचे सांगितले आहे. असे न करणार्‍या कंपन्यांविरूद्ध प्रशासन कठोर कायदेशीर कारवाई करेल असेदेखील नमूद करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांचे सोशल डिस्टंसन्स ठेवण्याचं नागरिकांना आवाहन 

सध्या पोलिस प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही यासाठी चोख व्यवस्था ठेवण्याचं आव्हान आहे. दरम्यान परदेशातून येणार्‍या नागरिकांना कोरोनाची लक्षणं आढळत असल्यास त्यांची स्वॉब टेस्ट केली जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्यावरही विशेष लक्ष दिले जात आहे. सध्य्या महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 47 वर पोहचला आहे.