Chandrakant Patil (Photo Credit - Facebook)

राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असून नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गेल्या काही महिनाभरापासून पु्ण्यातील (Pune) काही विभागात पाणी कपात (Water Cut) ही लागू करण्यात आली आहे.  भरपावसाळ्यात पाणीकपातीचा त्रास सहन करणाऱ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे शहरातील पाणीकपात उद्यापासून रद्द करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पूर्णवेळ पाणी मिळणार आहे. (हेही वाचा -  Mumbai Water Cut Update: मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांमध्ये पाणीसाठा 68.06% वर; अद्याप 10% पाणीकपात रद्द नाही)

पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने धरणसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता या प्रकल्पात एकूण 21.18 टीएमसी (72.65 टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला होता. खडकवासला धरणसाखळीत गेल्यावर्षी इतका पाणीसाठा जमा झाल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी 28 जुलै रोजी प्रकल्पात 21.46 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता, गुरुवारी सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून 3424 क्युसेस वेगाने मुठा नदीत पाणी सोडले जात होते.