Pune Crime: डेंटिग अॅपवर ओळख झालेल्या तरुणीची फसवणूक, 27 लाख रुपयांचा गंडा
Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Pune Crime: पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून एका २८ वर्षीय तरुणीची २७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणीची डेटिंग अॅपवरील एका तरुणाशी ओळख निर्माण झाली होती. त्यानेच फसवणूक केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे.( हेही वाचा-  मित्राने पार्टीत दारूच्या नशेत केली युट्युबरची हत्या, सात जणांवर एफआयआर दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी डेटिंग अॅपवर तरुणाची ओळख झाली होती. ओळखीनंतर दोघेंही एकमेकांशी बोलू लागले. तिला लग्नासाठी मागणी घातली होती. तरुणीने लग्नासाठी होकार दिला होती. पुढच्या वर्षी लग्न करू असं सांगत तरुणीला फसवण्याचा प्रयत्न करत होता. एका डेटिंग अॅप वरून हर्षितकुमार राय असं नाव असलेल्या तरुणाची ओळख झाली होती. तो उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे समजले. हर्षित आणि तक्रारदार दोघांही एकमेकांसोबत बोलू लागले. परंतु काही काळाने हर्षितने तरुणीकडून पैसे उसने घेण्यास सुरुवात केली. कधी कामाचं निमित्त देऊन तर कधी घरच्यांचे निमित्त देऊन हर्षीत तक्रारदाराकडून पैसे घेत राहिला.

तक्रारदाराला त्याने पैसै परत दिलेच नाही, त्यानंतर तीने लग्नासाठी विचारणा केली, त्याने नकार दिला.   तू माझ्याशी लग्न करण्यास लायक आहेस का? असा विरोध करत बोलणचं बंद केलं. तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. या गोष्टीला कंटाळून तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी हर्षित कुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आंग्रे तपास करत आहेत.