सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या संपूर्ण देश अडकला असून मृतांची संख्या आणि रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मात्र कधी कधी याच गोष्टीचा फायदा रुग्णालय प्रशासन घेते अशी प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहे. यात ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयाने (Private Hospital in Thane) तर मृताच्या कुटूंबाने हॉस्पिटलचे पूर्ण बिल भरले नाही म्हणून त्या मृत रुग्णाचे शव कुटूंबियांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. मुंबई मिररने (Mumbai Mirror) दिलेल्या माहितीनुसार, या मृताच्या कुटूंबियांनी ही बातमी सोशल मिडियावर व्हायरल केल्यानंतर हॉस्पिटल प्रशसनाने दखल घेत मृतदेह कुटूंबियांच्या स्वाधीन केला. या एकूणच प्रकारावरून खाजगी रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर येत आहे.
ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयाचा हा प्रकार असून या रुग्णालयात 17 ऑगस्टला या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेचे वय 40 वर्ष होते. ती 39 दिवस या रुग्णालयात उपचार घेत होती. या 39 दिवसाचा एकूण खर्च 36 लाख इतका झाला होता. त्यातील 28 लाख मृत महिलेच्या कुटूंबियाने भरले होते. उरलेले पैसे भरा त्यानंतरच मृतदेह ताब्यात देण्यात येईल असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. यामुळे गोंधळून गेलेल्या मृत महिलेच्या कुटूंबाने सोशल मिडियावर ही बातमी टाकल्यानंतर ती व्हायरल झाली. त्याची दखल घेत या रुग्णालयाने अखेर हा मृतदेह ताब्यात घेतला. धक्कादायक! मुंबईतील सायन रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याने 2 कर्मचा-यांना केले निलंबित, रुग्णाचे आधीच अन्य कुटूंबाकडून अंत्यसंस्कार झाल्याने नातेवाईकांचा आक्रोश