महाराष्ट्रातील कारागृहात असलेल्या कैद्यांना मिळणार मांसाहारी जेवण, स्नॅक्स; तब्बल दशकभरानंतर निर्णय
Jail (Representational Image/ Photo Credits: IANS)

महाराष्ट्रातील कारागृहात (Maharashtra State Jail) असणाऱ्या कैद्यांना आता मांसाराही जेवण आणि स्नॅक्सही मिळणार आहे. अपुऱ्या साधनसुविधा आणि सुरक्षा यांबाबत कारागृहातील कैदी (Prisoners) नेहमीच तक्रार करत असत. मात्र, आता त्यांना चक्क मांसाहारी जेवण ( Non-Vegetarian Food मिळणार आहे. तब्बल एक दशकभरानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मांसाराही जेवण, स्नॅक्स (Snacks Food) तसेच, हवाबंद पदार्थांवर काराग्रहात देण्यावर प्रतिबंद होते. मात्र, हे प्रतिबंद रद्द केल्यानंतर कारागृहातील कैद्यांना आठवड्यातून ठराविक दिवशी मांसाहार (Non-Vegetarian Meals) आणि इतर स्नॅक्सही उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने 2008 मध्ये कारागृहातील उपहारगृहामध्ये जेवण विक्री करण्यावर बंदी घातली होती. या बांदीसोबतच कैद्यांना मांसाहार आणि स्नॅक्स पुरवण्यावरही प्रतिबंध घातले होते. राज्य सरकारचे प्रतिबंद हे राज्य सरकार आणि जिल्हा अखत्यातरीत येणाऱ्या कारागृहांमध्ये लागू होते. दरम्यान, भायखळा कारागृहाचे अधिक्षक सदानंद गायकवाड यांच्या हवाल्याने मिड डे या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रतिबंध गेल्या एक आठवड्यापासून मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे कारागृहातील कैद्यांना मांसाहार आणि त्यासोबतच इडली, समोसा, उतप्पा आदींसारखे स्नॅक्समध्ये मोडणारे पदार्थही देण्यात येत आहेत. (हेही वाचा, तुरुंगातील कैद्यांची चंगळ : जेवणासाठी मिळणार पावभाजी, पुरी, छोले भटुरे, खीर यांसारखे पदार्थ)

भायकळा कारागृहात कैद्यांना साधारणपणे तीन वेळा अन्न मिळते. त्यात सकाळी 7 वाजता नाश्ता, सकाळी 10 वाजता जेवण, आणि दुपारी 4 वाजता रात्रीचे जेवण. दरम्यान, 12.30 च्या दरम्यान, स्नॅक्स किंवा इतर नाश्ता मिळतो. हे स्नॅक्स कैदी आपल्यासाठी साठवूनही ठेऊ शकतो. कारागृहातील कैदी हे कारागृहातून जेवण विकत घेत असतात. कारागृहातील कैद्यांना काम करावे लागते. या कामाचा त्यांना मोबदला मिळतो. कामाच्या मोबदल्यातून आलेल्या पैशातून कैदी जेवण विकत घेत असतात. तसेच, कैद्यांचे कुटुंबीयही त्यांना काही पैसे देऊ शकते.

प्राप्त माहितीनुसार, भायकळा कारागृहात कैद्यांना मिळणाऱ्या मांसाहारी जेवण ऑर्डरनुसार तयार केले जाते. जेवण तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे दर वेगवेगळे असतात. मात्र, 1 किलो चिकण करी 180 रुपयांच्या आसपास असते. तर, पनीर 200 रुपयांच्या आसपास असते.