महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अखेर संपली! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर, अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
Devendra Fadnavis, Ajit Pawar | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्ता स्थापनेचे तिढा सुटल्यामुळे राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवटी (Presidents Rule) अखेर संपली आहे. महाराष्ट्रात लवकरच शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार असे वातावरण निर्माण होत झाले असताना भाजप-राष्ट्रवादीने एकत्र येऊन स्थापन केली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यामध्ये भाजप-राष्ट्रवादीचे नवे सरकार आले असून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मुंबई येथील राजभवनामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री तर, अजित पवार (Ajit) यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. यावर शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 21 ऑक्टोबर रोजी पार पडली असून या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागला होता. या निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीला अधिक जागा मिळाल्या तरीदेखील मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. त्यांनतर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करतील, अशी जोरदार चर्चा सरु झाली असताना महाराष्ट्राच्या राजकारणाने नवे वळण घेतले आहे. मुंबई येथील राज्यभवामध्ये राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हे देखील वाचा-Mahrashtra Government Formation Live Updates: अजित पवार यांचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळिमा फासणारे; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या या निर्णयाला शरद पवार यांनी पाठिंबा नसल्याचे वृत्त अनेक वाहिन्यांवर झळकत आहे. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर संपली असून राज्यातील नव्या सरकारने सर्वांनाच धक्का बसला आहे.