Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न करणाऱ्या संगीता डवरे (Sangita Daware) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संगीता डवरे या पोलीस पत्नी होत्या. पोलीस दलात कर्तव्यावर असलेल्या पती हनुमंत डवरे यांना अपघात झाला. अपघातास कारण ठरलेल्या वाहन चालकावर कारवाई व्हावी अशी संगीता यांची मागणी होती. मात्र, अनेक बड्या अधिकाऱ्यांकडे चकरा मारुनही काहीच उपयोग झाला नाही. वाहन चालकावर कारवाई करण्याऐवजी त्याला सोडून देण्यात आल्याने संगीता डवरे हताश झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता. दरम्यान, त्यांनी मंत्रालयासमोर विशप्राशण करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

संगीता डवरे यांचे पती पोलीस दलाचे कर्मचारी होते. नवी मुंबई पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना पामबीच मार्गावर लावलेल्या नाकाबंदी सुरु होती. दरम्यान, एका भरधाव कारने पामबीच येथे पोलिसांनी लावलेले बॅरीकेट्स उडवले आणि थेट गाडी पुढे आणली. ज्यामुळे संगीता डवरे यांचे पती चिरडले गेल. ही घटना घडली तेव्हा कारचालक मंद्यधूंद अवस्थेत होता. या अपघाता संगीता यांच्या पतीच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली. त्यांना वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीने योग्य उपचार होत नसल्याचा त्यांचा आरोप होता. (हेही वाचा, Elderly Couple Commits Suicide In Charkhi: 30 कोटींची संपत्ती असलेला मुलगा, नातू IAS पण वृद्ध आजी-आजोबांना जेवणाची भ्रांत असल्याने आत्महत्या करून संपवलं जीवन)

दरम्यान, अपघातास कारण ठरुन पतिला चिडणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करावी, अशी संगिता डवरे यांची मागणी होती. मात्र, अनेक बडे अधिकारी आणि पुढाऱ्यांना भेटूनही त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई झाली नाही. उलट आरोपीला सोडून देण्यात आल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस दलातील कर्मचारीच आणि पोलीस दलच पोलिसाला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम नसल्याचे पाहायला मिळाले. पती हनुमंत डवरे याच्या वैद्यकीय बिलाची फाईलही अद्याप पोलीस दलाने मंजूर केली नाही, असा आरोप संगीता यांनी केला आहे. त्यामुळे आक्रमक होत त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. धक्कादाय म्हणजे पती हनुमंत डवरे अद्यापही अपघातातून सावरले नाहीत. सरकारी उदासीनतेमुळे एका महिलेचा हाकनाक जीव गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.