गोंदिया मध्ये नक्षलींचा कट फसला, पुलाखाली लपवलेली स्फोटकं जप्त
Representational Image (Photo Credit: PTI)

गोंदिया : महाराष्ट्रासह देशभरात नक्षली कारवायांचा जोर वाढताना पाह्यला मिळत आहे. आज देखील गोंदिया (Gondiya) मध्ये स्फोट घडवून आणण्याचा हेतूने एका पुलाखाली काही स्फोटकं लपवून ठेवण्यात आली होती, मात्र पोलिसांनी या स्फोटकांचा शोध घेऊन वेळीच जप्त केल्याने मोठा अनर्थ टाळल्याची माहिती समोर येत आहे. हा संपूर्ण प्रकार सालेकसा (Salekasa Police)  पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार पडला . या घटनेनंतर पोलिसांच्या तत्परतेचे व समयसूचकतेचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

ABP माझाच्या वृत्तानुसार, गोंदियामध्ये टेकाटोला ते मुरकडोह दंडारी गावाच्या रस्त्यावरील पुलाखाली अरुंद जागेत जर्मनच्या डब्ब्यात काही स्फोटके लपवून ठेवण्यात आली होती. या स्फोटकांनी भूसुरंग स्फोट घडवून आणण्याचा या नक्षलवाद्यांचा कट होता मात्र या बाबत माहिती मिळताच तात्काळ या स्थळी जाऊन पोलिसांनी हे स्फोटक सामान जप्त केले, त्यामुळे नक्षलांचा हा कट फसला. मागील आठवड्यातच गडचिरोली मध्ये एका नक्षलवाद्याने पोलिसांसमोर आंसमर्पण केले होते. मात्र अद्याप दिवसागणिक समोर येणाऱ्या हल्य्याच्या घटना पाहता नक्षली कृत्यांवर आळा बसवण्यात पोलिसांना तितकंसं यश मिळत नाहीये. Naxal Attack In Gadchiroli: गडचिरोलीत पुन्हा जाळपोळ, नक्षलांनी पेटवली रस्ता बांधणीसाठीची वाहने

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी समान पार्श्ववभूमीवर आयईडी स्फोट घडवून आणला होता या भीषण हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते, त्याच घटनेची पुनरावृत्ती करत आज गोंदियामध्ये हा कट रचण्यात आला होता.