सलग सुट्यांमुळे फिरण्याच्या उद्देशाने बाहेर पडणाऱ्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर आज साता-याच्या दिशेने पुण्याहून येणा-या वाहनांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. यामुळे या महामार्गावर अधून मधून वाहनधारकांना वाहतुक कोंडीस समोरे जावे लागत आहे. याच महामार्गावर एक चार चाकी कॅनॉलमध्ये पडली. या घटनेनंतर नागरिकांनी वाहनातील सर्वांचे प्राण हे पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचवण्यात आले आहे. (हेही वाचा Mumbai News: मुंबईत 99 वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया, जसलोक रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया)
पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी घाटा जवळ असणाऱ्या एका कॅनॉलमध्ये एक चार चाकी वाहन कोसळले. या वाहनात चार प्रवासी होते. कॅनॉल मध्ये पडलेले वाहन वाहून जाताना पोलिसांनी आणि नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने पुढील दुर्घटना टळली. या घटनेनंतर चौघांचा जीव वाचविण्यात नागरिकांना यश आले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान ग्रामस्थांच्या आणि पोलिसांच्या धाडसामुळे या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पोलीस घटनेचा तपास करीत असून गाडीतील लोकांना सध्या प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.