nashik police suicide

Nashik Police Committed Suicide: महाराष्ट्रातील नाशिक शहराच्या अंबड पोलिस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिस ठाण्यात अधिकाऱ्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.  पोलिस निरिक्षक अशोक नजन असं आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचने नाव आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येच नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ( हेही वाचा- भरदिवसा नाशिक येथे भाजीविक्रेत्याचा खून, तीन तासात आरोपी पोलीसांच्या ताब्यात)

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक अशोक नजन कॅबीनमध्ये सकाळी बसले होते. तेव्हा अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला आणि ठाण्यातील सर्व अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांनी अशोक यांच्या कॅबिमध्ये धाव घेतली. अशोक यांनी डोक्यात स्वत:च्या पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस ठाण्यात या घटनेनंतर गोंधळाची परस्थिती निर्माण झाली. पोलिस अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.

या घटनेची माहिती अशोक यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. अशोक यांचे मृतदेह जिल्हा रुग्णालायात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.पोलिसांनी पिस्तूल जप्त केली. या घटनेनंतर नाशिक पोलिस दलात शोककळा पसरली. त्यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेनंतर अशोक यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.