Ajanta Verul Caves (Photo Credits: Wikimedia Commons)

Mumabi: खारघर येथील वसतिगृहातून बेपत्ता झालेल्या वैद्यकीय विद्यार्थ्याला रेल्वे पोलिसांनी नाशिकमधील पवित्र बौद्ध जागेवरून 110 किलोमीटर अंतरावर शोधून काढले आहे. 23 वर्षांच्या विद्यार्थ्याने स्वत: ची ओळख गुप्त ठेवून पोलिसांना सांगितले की, तो बौद्ध धर्मात परिवर्तित होण्यास उत्सुक आहे. बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यासाठी तो काही संस्थाचा शोध घेत आहे. पोलिसांनी या विद्यार्त्थांला पुन्हा वसतिगृहात आणले आहे.

बेपत्ता झालेला विद्यार्थी मराठवाड्यातील असून त्याने 9 मार्च रोजी लुंगी आणि शाल घालून वसतिगृह सोडले होते. त्यानंतर तो परत आला नाही म्हणून वसतिगृह अधिकाऱ्यांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. वसतिगृह अधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्याची सिक्युरिटी गार्डजवळ विचारपूस केली. यावेळी सिक्युरिटी गार्डने सांगितलं की, संबंधित विद्यार्थी 9 मार्च रोजी वेगळी वेशभूषा करून हॉस्टेल बाहेर पडला होता. वसतिगृहाच्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरी केल्यानंतर सिक्युरिटी गार्डने त्याला वेगळ्या वेशभूषेवरून काही सूचना केल्या होत्या. मात्र, यावेळी या विद्यार्थ्यांने गार्डसोबत हुज्जत घालत वसतिगृह सोडलं. (वाचा - Mumbai: 68 वर्षाच्या वयोवृद्धाने मुक्या प्राण्यांना केले वासनेची शिकार; तब्बल 30 कुत्र्यांवर बलात्कार, पोलिसांकडून अटक)

या विद्यार्थ्याने ट्रेनने नाशिक गाठलं असल्याची शक्यता रेल्वे क्राइम ब्रँचने व्यक्त केली आहे. पोलिसांनी या तरुणाच्या मित्रांना त्याच्याविषयी विचारलं असता संबंधित विद्यार्थ्याला आध्यात्माचं प्रचंड वेड असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर वसतिगृहाच्या व्यवस्थापनाने नवी मुंबईतील ध्यान केंद्रांवर या विद्यार्थ्याची चौकशी केली. मात्र, काहीही तपास लागला नाही. त्यानंतर रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने ध्यानासाठी प्रसिद्ध असलेले इगतपुरी येथील विपश्यना अकादमीला जाण्याचे ठरविले.

दरम्यान, या ठिकाणी चौकशी केल्यानंतर पोलिसांना संबंधित विद्यार्थी इगतपुरी केंद्रात असल्याची माहिती मिळाली. यावेळी या विद्यार्थ्याने बौद्ध धर्मात रूपांतर करण्याची इच्छा व्यक्त केली. अकादमीच्या कर्मचार्‍यांनी त्याला सांगितले की, ते त्याला मदत करू शकत नाहीत. त्यानंतर तो तेथून निघून गेला. केंद्रातील एका रक्षकाने पोलिसांना सांगितले की, या तरुणांने नाशिकमधील पांडव लेणी-बौद्ध लेण्यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर विद्यार्थाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक नाशिक येथे गेले असता त्यांना या विद्यार्थाचा शोध लागला. पैसे नसल्याने या विद्यार्थाने इगतपुरी केंद्रापासून पांडव लेणी पर्यंत 50 कि.मी. अंतर पायी कापले होते. शुक्रवारी क्राइम ब्रँचने त्याला पुन्हा पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच पोलिसांनी या विद्यार्थ्याला पुन्हा त्याच्या वसतिगृहात पाठवले आहे.