पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika) वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (Bharatratna Atal Bihari Vajpayee Medical College) मध्ये प्राध्यापक ते ट्युटर अशा विविध पदांवर नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. 91 जागांसाठी होणार्या या भरती प्रक्रियेमध्ये काही तात्पुरत्या स्वरूपाच्या कलावधीसाठी होणार्या नोकरभरती करिता अर्ज मागवण्यात आले आहेत. याकरिता येत्या 29 सप्टेंबर दिवशी मुलाखती होणार आहेत. जुना GB हॉल तिसरा मजला पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे इथे इच्छूक उमेदवारांना अर्ज करायचा असून तेथेच मुलाखती देखील घेतल्या जाणार आहेत. (नक्की वाचा: Arogya Vibhag Maharashtra: आरोग्य विभागाच्या 6205 जागांसाठी 25-26 सप्टेंबर रोजी परीक्षा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उमेदवारांना दिल्या महत्वाच्या सुचना (Watch Video)).
दरम्यान प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर, सिनियर रेसिडेंट आणि ज्युनियर रेसिडेंट या पदांसाठी नोकरभरती होणार आहे. याकरिता पदांनुसार वेगवेगळी पात्रता आहे पण MD/MS/DNB, MBBS पदवी असणं आवश्यक आहे. पदांनुसार पुन्हा वयोमर्यादा देखील वेगवेगळी आहे.पण किमान 38 ते 50 वर्षांपर्यंतचे उमेदवार यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. आरक्षणांच्या नियमांनुसार वयोमर्यादेची अट शिथिल केली जाणार आहे. मानधन देखील पदानुसार वेगवेगळे आहे. सारी सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
आरक्षित जातीतील उमेदवारांना अर्जासोबत 300 रूपये तर ओपन कॅटेगरी मधील उमेदवारांना 500 रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. अर्ज करण्याची पद्धत, अर्हता, आरक्षण, निवड प्रक्रिया याची सविस्तर माहिती www.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.