
PM Narendra Modi in Sindhudurg: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय नौदल दिनानिमित्ताने (Navy Day) तारकर्ली येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात आज पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे. यावेळी नौदलाकडून नौदल दिनाच्या निमित्तााे प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे. (हेही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; शिर्डी साईबाबांचे दर्शन
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३.४० वाजण्याच्या सुमारास चिपी विमानताळावर दाखल होणार आहे. त्यानंतर ते राजकोट किल्ल्याकडे रवाना होतील. याच ठिकाणी छत्रपती महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर त्यानंतर पंतप्रधान सिंधुदुर्ग येथे ‘नौदल दिन 2023’ सोहळ्याच्या कार्यक्रमात सहभागी होतील. तारकर्ली समुद्रकिनारा, सिंधुदुर्ग येथून भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांचे ‘ऑपरेशनल प्रात्यक्षिक’ पंतप्रधान पाहणार आहेत.
त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत, तिथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.या वेळी ते संबोधित करणार आहे. दरवर्षी ४ डिसेंबर रोजी 'नौदल दिन' साजरा केला जातो. सिंधुदुर्ग येथे 'नौदल दिन 2023' उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारसाला आदरांजली अर्पण करतो.