प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

राज्य शासनाने प्लास्टिक बंदीमुळे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या स्थितीचा मोठा फटका दुध उत्पादकांना झाला आहे. त्यामुळे दुध विक्रिसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर करयाचा की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्लास्टिक बंदीमुळे दुधाची विक्री बाटलीतून केली तर, 'ग्राहकांना प्रतिलीटर पाठी 10 ते 15 रुपये मोजावे लागतील' असा निर्णय राज्य दूध कल्याणकारी खासगी दूध उत्पादकांनी घेतला.

प्लास्टिक बंदीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी दूध उत्पादकांनी मागणी केली आहे. अन्यथा राज्यातील दूध उत्पादक आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील खासगी दूध उत्पादक आणि राज्य शासन यांच्यामध्ये वाद होण्याती शक्यता वर्तविली जात आहे. मात्र ग्राहकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसणार आहे.

तर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदी हटविणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. तसेच दूध उत्पादक यांनी रामदास कदम यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी त्यांनी भूमिका मांडली आहे.