अरूंद पूल आणि प्रवाशांची ऑफिसच्या वेळेत उसळणारी गर्दी पाहता मध्य रेलवे मागील काही वर्षांपासून परेल रेल्वेस्थानकाला टर्मिनल्स बनवल्यासाठी प्रतिक्षेमध्ये होते. अखेर परेल टर्मिनल्सला मुहूर्त लागला आहे. मार्च 2019 पासून मध्य रेल्वेचे परेल स्थानकही टर्मिनल्स होणार आहे. त्यामुळे मुठीत जीव घेऊन परेल स्थानकातून बाहेर पडणार्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
परेल, वरळी या भागात अनेक कॉरपरेट ऑफिस असल्याने सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस परेल स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळते. मात्र परेल रेल्वे स्थानक टर्मिनल्स झाल्यानंतर आता ठाणे, कल्याण या ठिकाणी जाण्यासाठी परेल स्थानकातून सुटणारी ट्रेन उपलब्ध होणार आहे.
परेल टर्मिनल्स झाल्यानंतर दादर स्थानकावरील भारदेखील कमी होण्याची शक्यता आहे. याकरिता परेल स्थानकात विशेष प्लेटफॉर्म बांधण्याचं काम सुरू आहे.
मध्य रेल्वेवर काही बिघाड झाल्यास कुर्ला स्थानकातून ट्रेन सोडण्यात येतात. मात्र आता परेल टर्मिनल्समुळे सीएसएमटीवरील भारदेखील हलका होण्याची शक्यता आहे. परेल टर्मिनल्सद्वारा बाहेरगावी जाणार्या गाड्यांसाठीही विशेष सेवा खुली राहणार आहे.
नक्की वाचा : प्रवाश्यांचा वेळ वाचणार, जनरल तिकिट ही मिळणार ऑनलाईन