महिला उपसरपंचाने राजीनामा द्यावा यासाठी सरपंचाच्या कुटुंबाने त्या महिलेला मारहाण केल्याची संतापजनक घटना परभणी (Parbhani) मध्ये घडली आहे. या मारहाणी मध्ये महिला उपसरपंचाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सेलू (Selu) मधील ब्राम्हणगाव मधील आहे. या प्रकरणात सरपंच सह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक झालेल्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरूष आहेत. सध्या गावात या घटनेमुळे तणावपूर्ण शांतता आहे. तर पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात आहे.
उपसरपंच पदाच्या राजीनाम्यावरून सुरू झालेली हाणामारी मुलाच्या मृत्यू पर्यंत पोहचली. परभणीच्या सेलू तालुक्यातील ब्राम्हणगावच्या सरपंच शशिकला कांबळे यांच्या घरी 5 ऑगस्ट दिवशी सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे,महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे आले. त्यांनी शशिकला यांना उपसरपंच पदाचा राजीनामा द्या म्हणत मारहाण सुरू केली.
शशिकला कांबळे यांचा मुलगा निखिल कांबळ याला रॉडने मारण्यात आले. त्यामध्ये तो जबर जखमी झाला. रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्यच ठरवणार सरपंच कोण, जनतेतून थेट निवड रद्द; अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मंजूर .
शशिकला यांनी सेलू पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून सरपंच साधना डोईफोडे व अन्य चार जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या गावात तणावाचं वातावरण असल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे.