Parbhani Bus Accident: परभणीत बस पुलावरून खाली कोसळली, 25 प्रवासी गंभीर जखमी

परभणी (Parbhani) जिल्ह्यात एक पुलावरून 50 फुट खोल खाली बस (Bus) कोसळल्याची घटना घडली आहे. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील अकोली येथे जिंतूरहुन सोलापूरला जात असलेली बस नदीच्या पुलावरून खाली कोसळली आहे. या अपघातात बसमधील  25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.  जखमी प्रवाश्यांना जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  जिंतूरहून सोलापूरकडे (Jintur Solapur Bus) जाणाऱ्या बसचा अकोली पुलाजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं ही बस पुलाच्या खाली कोसळल्याची माहिती आहे.  (हेही वाचा - Kolhapur Accident: भरधाव ट्रकने चिरडल्याने 4 मजूरांचा जागीच मृत्यू, 8 जखमी, कोल्हापूरात भीषण अपघात)

आज सकाळच्या सुमारास ही बस सोलापूरकडे निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी बसलेले होते. त्यावेळी बस अकोली पुलाजवळ आल्यानंतर ही घटना घडली आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिक नागरिक देखील मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. तर, सर्व जखमींना तात्काळ जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

जिंतुर-सोलापुर ही बस सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलावरून जात असतानाच अपघता झाला. चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने वळणावरून बस तब्बल 50 फूट खोल नदीपत्रात कोसळली. दरम्यान परभणीच्या जिंतुर तालुक्यातील अकोली नदीवरील पूल अपघाताचा केंद्र बनला आहे. कारण मागील काही वर्षात याठिकाणी सतत अपघाताच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, आज पुन्हा असाच अपघात समोर आला.