
पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना आता पनवेल मध्येही एका मुलीवर अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे. कॉलेजला निघालेल्या मुलीवर बसस्टॉप वर सोडतो या बहाण्याने आरोपीने गाडीत बसवलं नंतर चिंचवली शिवरा भागात अज्ञात स्थळी तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 10 दिवसांपूर्वीची आहे. पण पीडीतेने आज पालकांना सारा प्रकार सांगितला. त्यानंतर पनवेल तालुका पोलिस ठाण्यात आरोपी अमोल पदरथ वर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
सकाळी विद्यार्थीनी कॉलेजला जायला निघाली होती. तेव्हा आरोपीने बसस्टॅाप वर सोडतो असे सांगून तिला गाडीत बसवलं. गाडी अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आले. या प्रकारानंतर घाबरलेल्या विद्यार्थीने कुटूंबाला घडला प्रकार सांगितला नव्हता. आज मुलीने तिच्यासोबत झालेल्या गैरप्रकाराची माहिती दिली त्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला सध्या 18 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नक्की वाचा: Sex Racket Bust in Mumbai: मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 4 महिला कलाकारांची सुटका .
न्यूज 18 मराठीच्या वृत्तानुसार, इको कार चालकाने मुलीला शेतात नेलं आणि तिथे तिच्यावर लैगिंक अत्याचार झाले. ही घटना सकाळी साडे सहाच्या सुमाराची आहे. सकाळी फार वर्दळ नसल्याने संधीचा फायदा घेत त्याने मुलीवर अत्याचार केले यावेळी शेतात गेल्यावर 'तू मला आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो', असं आरोपी पीडितेला म्हणाला आणि तिच्यावर अत्याचार केले.