
पंढरपूर (Pandharpur) मध्ये विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनाला (Vitthal Rukmini Darshan) येणार्यांना सुकर दर्शन घेता यावं यासाठी मंदिर प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.अनेकदा विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना बराच वेळ तिष्ठत उभं रहावं लागत होते मात्र आता त्यामध्ये बदल होणार आहेत. आज घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये आता नवविवाहित दांम्पत्यांना पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही. त्यांना थेट दर्शनासाठी सोडले जाणार आहे. त्यांच्यासोबत 3 जणांनाही दर्शन मिळणार आहे.
माघी यात्रेची तयारी
पंढरपूरामध्ये माघी यात्रेनिमित्त येणार्यांची देखील बडदास्त ठेवली जाणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती देताना माघी यात्रेदरम्यान ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन बंद राहणार असल्याचं म्हटलं आहे. भाविकांना लवकरात लवकर दर्शन घेता यावं म्हणून सहा पत्रा शेड्स उभारल्या जाणार आहेत. यंदा 8 फेब्रुवारीपासून ही माघी यात्रा असेल. Maghi Ganesh Jayanti 2025: माघी गणेश चतुर्थीची तारीख, पूजा विधी आणि मुहूर्त, जाणून घ्या .
स्थानिकांची पंढरपूरच्या विठ्ठल -रूक्मिणी मंदिरात वेळ
पंढरपूरच्या स्थानिकांना मंदिरात दर्शन घेण्याची वेळ आता वाढली आहे. पंढरपूर शहरातील नागरिकांसाठीही आता सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10.30 या वेळात आता थेट दर्शन मिळणार आहे.
दर्शन रांगेत मृत्यू झाल्यास आर्थिक मदतीचा हात
विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनाला येणार्यांमध्ये अपंग, दिव्यांग आणि अतिवृद्ध भाविकांना लवकर दर्शन दिले जाणार आहे. दिव्यांगांसाठी व्हिलचेअर ची सोय केली जाणार आहे. यामध्ये जर भाविकाचा दर्शन रांगेत मृत्यू झाला तर भाविकांना लाख भर रूपयांची मदत मिळणार आहे. मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्च मंदिर प्रशासन करणार आहे. नक्की वाचा: Siddhivinayak Mandir Dress Code: प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता अंगभर कपडे परिधान केलेल्यांनाच बाप्पाचं दर्शन मिळणार; ड्रेसकोड होणार जारी.
29 जानेवारी पासून पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये दर्शनाचे हे नियम लागू केले जाणार आहेत. त्यामुळे आता भाविकांना दर्शनासाठी फार काळ तिष्ठत राहावं लागणार नाही.